Tata Altroz 2025: नवीन मॉडेलचे संपूर्ण रिव्ह्यू व तुलनात्मक माहिती.
नमस्कार मित्रांनो आपण आज या ब्लॉगमध्ये टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या गाडीत टाटा कंपनीने काही चेंजेस केलेले आहेत व काही फीचर सुद्धा ॲड केलेले आहेत ते आपण पाहणार आहोत.
Tata Altroz Varients and Prices:
All New Altroz Personas | Petrol MT | Petrol AMT | Petrol DCA | CNG MT | Diesel MT |
---|---|---|---|---|---|
Smart | 6.89 | – | – | 7.89 | – |
Pure | 7.69 | 8.29 | – | 8.79 | 8.99 |
Pure S | 8.05 | 8.65 | – | 9.15 | 9.35 |
Creative | 8.69 | 9.29 | – | 9.79 | – |
Creative S | 9.05 | 9.65 | 10.30 | 9.99 | 10.35 |
Accomplished S | 9.99 | – | 11.24 | 11.09 | 11.29 |
Accomplished + S | – | – | 11.49 | – | – |
टाटा अल्ट्रोज च्या व्हेरिएंट ची माहिती आपण वरती पाहू शकता. आपल्याला यात बरेच वेरीएंट पाहायला मिळतात व त्यांची किंमत आपण पुढे पाहू शकता. ही गाडी आपल्याला पेट्रोल मॅन्युअल, पेट्रोल ऑटोमॅटिक ,पेट्रोल डीसीई ,सीएनजी मॅन्युअल आणि डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन यात बघायला मिळते.
Tata Altroz Exterior:
या गाडीमध्ये आपल्याला एलईडी लाइट्स आता देण्यात आलेले आहेत अगोदर आपल्याला हॅलोजन लाईट देण्यात आलेल्या होत्या. एलईडी लाईटच्या वरती एब्रो स्टाइल डी आर एल सुद्धा देण्यात आलेलं आहे. फॉग लॅम्प सुद्धा आपल्याला एलईडी मध्ये देण्यात आलेला आहे. समोरच्या बाजूला आपल्याला कोणताही पार्किंग सेन्सर देण्यात आलेला नाही. टाटाच्या लोगोच्या खाली आपल्याला थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे.
185/60 R18 ही टायर साइज आपल्याला चारी चाकांमध्ये बघायला मिळते. या चाकांची डिझाईन इलेक्ट्रिक गाड्यांच्या चाकण पासून इन्स्पायर आहे. या गाडीमध्ये आपल्याला ड्रायव्हर आणि पॅसेंजर च्या साईटला फ्लॅश टाईप डोअर हँडल देण्यात आलेला आहे. गाडीच्या मागच्या बाजूला आपल्याला कनेक्टेड टेल लॅम्प देण्यात आलेल्या आहेत. गाडीच्या मागच्या साईटला आपल्याला टाटा मोटरचा लोगो सुद्धा बघायला मिळतो व त्याच्या खाली बॅक कॅमेरा देण्यात आलेला आहे आणि हे बॅजिंग बघायला मिळते. टाटाच्या लोगोच्या खाली बटन देण्यात आलेल्या आहे ते बटन दाबलं की आपण बूट ओपन करू शकतो. आपल्याला वायपर देण्यात आलेल्या आहे मागच्या काचेसाठी सुद्धा. या गाडीत आपल्याला शार्क फिल्म अँटेना सुद्धा देण्यात आलेला आहे. ड्रायव्हरच्या साईटला दरवाज्याच्या बाहेर रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आलेला आहे. या गाडीत 90 डिग्री उघडणारे दरवाजे आपल्याला बघायला मिळतात.
Tata Altroz Interior:
चला तर मग गाडीचे इंटिरियर बद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. या गाडीत आपल्याला टू स्पोक स्टेरिंग विल देण्यात आलेला आहे. टाटाच्या नवीन गाड्या प्रमाणे या गाडी सुद्धा आपल्याला डिजिटल लोगो बघायला मिळतो. या गाडी 10.25 इंची चा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. ड्रायव्हरच्या समोर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये सुद्धा मोठी स्क्रीन देण्यात आलेली आहे. त्या स्क्रीन मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले सुद्धा मिरर होते. ही स्क्रीन फक्त टॉप अँड मॉडेल मध्ये आपल्याला बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला चारही पॉवर विंडो बघायला मिळतात पण वन टच अप डाऊन चे फीचर आपल्याला देण्यात आलेलं नाही. गाडीच्या ड्रायव्हर साईट दरवाजामध्ये एक मोठी साईची बॉटल बसेल एवढा स्पेस देण्यात आलेला आहे. आपल्याला या गाडीमध्ये इंजिन स्टार्ट स्टॉप चे बटन देण्यात आलेला आहे. चावीनी गाडी चालू करायचा ऑप्शन नाही.
या गाडीच्या स्टेरिंग वरती आपल्याला खूप सारे कंट्रोल बघायला मिळतात. जसे की ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल कनेक्टिव्हिटी, वोल्युम अप डाऊन,आणि क्रूज कंट्रोल. स्टेरिंग च्या साईडला इंडिकेटर मध्ये ऑटो सेंसिंग रेन वायपरचे कंट्रोल देण्यात आलेला आहे. आणि दुसऱ्याच बाजूला ऑटोमॅटिक लाईटची कंट्रोल देण्यात आलेला आहे. या गाडीची स्टेरिंग वर खाली ऍडजेस्ट होते. टाटा अल्टो च्या स्क्रीन मध्ये आपल्याला अँड्रॉइड ऑटो ,एप्पल कार प्ले ,क्लायमेट , मूड लाईट मीडिया, रेडिओ असे भरपूर सारे फीचर्स बघायला मिळतात.
या गाडीमध्ये आपल्याला ड्रायव्हिंग नेक्स्ट हे फीचर देण्यात आले आहे त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी गाडीबद्दल जाणून घेऊ शकतो जसे की फ्यूलिफिकेशन्सी ,आरपीएम इंजिन आयडल टाईम, टॉप स्पीड ऍव्हरेज एक्ससेलरेशन,, प्रॉपर गिअर युज पर्सेंटेज, मोस्ट गिअर युज पर्सेंटेज, इत्यादी. थ्री सिक्सटी कॅमेरा ची क्वालिटी खूपच छान अशी आहे. या गाडीमध्ये आपल्याला टच पॅनेल मोठ्या स्क्रीनच्या खाली देण्यात आलेला आहे त्यात सुद्धा बरेच कंट्रोल आपल्याला बघायला मिळतात. या टच पॅनल मध्ये आपल्याला टेंपरेचर कंट्रोल आणि फॅन ची स्पीड कंट्रोल करण्याचे दोन बटन देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये आपल्याला 65 वाट चा चार्जिंग बघायला मिळते. जर का तुम्हाला अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल का प्ले कनेक्ट करायचा असेल तर टाइप ए केबल वापरून तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि आपल्याला 12 चे सॉकेट सुद्धा देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला वायरलेस चार्जर सुद्धा बघायला मिळतो.
टाटा ट्रक मध्ये आपल्याला नॉर्मल हॅन्ड ब्रेक देण्यात आलेला आहे . या गाडीत आपल्याला सन रूप सुद्धा देण्यात आलेले आहे. गाडीचे सीट खूपच असे कम्फर्टेबल आपल्याला बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक नव्हे तर मेकॅनिकल सीटचे कंट्रोल देण्यात आलेले आहे.. या गाडीच्या पॅसेंजर साठी सुद्धा 65 वॅटच्या टाईप सी केबलची चार्जिंग देण्यात आलेली आहे. पॅसेंजर सीट मध्ये ताई सपोर्ट पण खूपच असा देण्यात आलेला आहे. पॅसेंजर सीट मध्ये सुद्धा आपल्याला कफ होल्डर आणि आम रेस्ट बघायला मिळते.
Tata Altroz Boot Space:
टाटा अल्टो ही खूपच अशी प्रॅक्टिकल गाडी आहे भारतामध्ये या गाडीमध्ये आपल्याला तब्बल 345 लिटर एवढा बूट स्पेस बघायला मिळतो. आपण यात दोन लार्ज सुटकेस, एक केबिन साईज बॅग ,आणि शॉपिंग बॅग डेली ग्रोसरी ,इत्यादी वस्तू ठेवू शकतो. आपण आपल्या सोयीप्रमाणे मागील सीट 60:40 या रेशो मध्ये स्प्रेड करू शकतो. यातून आपल्याला खूपच असा स्पेस वाढवून मिळतो.
Tata Altroz Saftey Features:
जसे की आपल्याला माहिती आहे टाटा कंपनी ही सेफ्टी च्या बाबतीत भारतातली सर्वात टॉपची कंपनी आहे. चला तर मग टाटाच्या या गाडीत काय काय सेफ्टी फीचर्स देण्यात आलेले आहेत ते आपण पाहून घेऊयात.
1)या गाडीला क्रॅश टेस्ट रेटिंग मध्ये ग्लोबल एन्केप फाईव्ह स्टार रेटिंग एवढे भेटलेले आहेत.
2) ड्युअल एअर बॅग आपल्याला देण्यात आलेले आहेत.
3) एबीएस आणि ईबीडी आपल्याला सुद्धा बघायला मिळते.
4) हिल फोल्ड असिस्ट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, आणि चाइल्ड सीट अँकर सुद्धा देण्यात आलेले आहेत.
Tata Altroz Transmission Type:
टाटा कंपनीने यात आपल्याला खूप सारे ट्रान्समिशनचे ऑप्शन देण्यात आलेले आहे जसे की.
1) मॅन्युअल ट्रान्समिशन(MT): सगळ्या फ्यूल ऑप्शन साठी उपलब्ध.
2) ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन(AMT): ऑटोमॅटिक गेअर शिफ्टिंग.
3) ड्युअल क्लच ऑटोमॅटिक(DCA): स्मूथ गाडी चालवण्याच्या अनुभवासाठी.
हे सारे ट्रान्समिशन प्रकार आपल्याला बघायला मिळतात.
Feature | Smart | Pure / Pure S | Creative / Creative S | Accomplished S | Accomplished + S |
---|---|---|---|---|---|
Touchscreen Display | No | 7-inch (S only) | 10.25-inch | 10.25-inch | 10.25-inch |
Android Auto / Apple CarPlay | No | Yes (Wired) | Yes (Wireless) | Yes (Wireless) | Yes (Wireless) |
Reverse Camera | No | Yes (S only) | Yes | 360° View | 360° View |
Alloy Wheels | No | No | Yes | Yes (Premium Design) | Yes (Premium Design) |
Ambient Lighting | No | No | Yes | Yes | Yes |
Rear AC Vents | No | Yes (S only) | Yes | Yes | Yes |
Connected Car Features (iRA) | No | No | Yes (Creative S) | Yes | Yes |
Push Start/Stop | No | No | Yes (Creative S) | Yes | Yes |
Voice Commands | No | No | Yes | Yes | Yes |
शेवटी जर का तुम्हाला चांगली अशी प्रीमियम हॅचबॅक स्ट्रॉंग बोल्ड क्वालिटी आणि ॲडव्हान्स फीचर्स मल्टिपल फ्युएल ऑप्शन आणि सेफ्टी तर अल्ट्रोझ ही तुमच्यासाठी बेस्ट चॉईस आहे असे मला तरी वाटते. धन्यवाद
जर का तुम्हाला टाटा हॅरियर बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा.
जर का तुम्हाला या गाडी बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा.