कार्स

Kia Carens Clavis 2025 Facelift:जाणून घ्या या गाडीबद्दल संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो चला तर मग आपण आज किया कॅरेन्स कॅल्विस गाडी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही गाडी आता फेसलिफ्ट मध्ये लॉन्च झालेले आहे. यात कंपनीने भरपूर सारे नवीन फीचर्स असे वाढवलेले आहेत चला तर मग एक एक करून आपण सगळ्या गोष्टी पाहूयात.

Kia Carens Exterior Design:

सुरुवात आपण चावीपासनं करूयात या गाडीच्या चावीमध्ये आपल्याला चार फीचर्स बघायला मिळतात. ती आहेत लॉक, अनलॉक, होल्ड आणि बूट ओपन साठी. या फीचर्स चा वापर करून आपण गाडीला उघडू शकतो बंद करू शकतो गाडीचे बूट ओपन करू शकतो व होल्ड हे फीचर वापरून आपण गाडीतला एसी बाहेरून चालू करू शकतो व गाडी सुद्धा चालू करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा ही गाडी आपल्याला 6 सीटर व 7 सीटर या वेरेंट्स मध्ये अवेलेबल आहे. ही गाडी आपल्याला पेट्रोल आणि डिझेल या फक्त दोन फ्युएल टाईप वर बघायला मिळते. या गाडीच्या समोरच्या बाजूला आपल्याला तीन-तीन रिफ्लेक्टर बेस एलईडी लाईट देण्यात आलेले आहेत. समोरील बाजूस संपूर्ण कनेक्टिंग एलईडी डी आर एल सुद्धा देण्यात आलेल्या आहे. समोरच्या बाजूला अजून तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसे की तीन पार्किंग सेन्सर आपल्याला देण्यात आलेले आहेत. थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा हे गाडीचे अत्यंत महत्त्वाचे फ्युचर आहे व ते ह्या गाडीत उपलब्ध आहे त्याचा एक कॅमेरा आपल्याला नंबर प्लेटच्या वरती बघायला मिळतो.

एड्स हे सुद्धा गाडी देण्यात आलेला आहे व ते चालण्यासाठी लागणारे रडार आपल्याला नंबर प्लेटच्या खाली देण्यात आलेला आहे. समोरच्या हूड वरती आपल्याला किया कंपनीचा लोगो बघायला मिळतो. या गाडीत आपल्याला रेन सेन्सिंग वायपर सुद्धा देण्यात आलेले आहेत. ही गाडी जुन्या गाडीची फेसलिफ्ट असल्यामुळे आपल्याला यात आलोय व्हील वेगळे बघायला मिळतात आता हे आलोय व्हील 17 इंच झालेले आहेत. या गाडीच्या मागच्या बाजूला आपल्याला कनेक्टिंग एलईडी ब्रेकलँप देण्यात आलेले आहेत. या गाडीत मागच्या बाजूला कॅरेन्स बरोबर आता कॅरेन्स क्लीवीस ही बॅचिंग नवीन पाहायला मिळते. या गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला रिक्वेस्ट सुद्धा देण्यात आलेला आहे.या गाडीची फुल टॅंक कॅपॅसिटी 45 लिटर एवढी आहे.

या गाडीच्या एक्सटेरियर डिझाईन मध्ये खूप सारे अजून फिचर देण्यात आलेले आहेत ते आपण पाहून घेऊयात. सर्वप्रथम आपल्याला चारी टायर्स r17 43.66 सेंटीमीटर किंवा 17 इंची या साईज मध्ये देण्यात आलेले आहेत. हे चारही टायर्स क्रिस्टल कट ड्युअल टोन आलोय विल मध्ये आपल्याला बघायला मिळतात. समोरच्या बाजूला आपल्याला बॉडी कलर फ्रंट बंपर देण्यात आलेला आहे व मागील बाजूस बॉडी कलर रेड बंपर देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला पुढील व मागील बाजूस स्किड प्लेट विथ सॅटन क्रोम फिनिश मध्ये देण्यात आलेला आहेत. या गाडीचे दरवाजे सिल्वर मेटल एक्सीडेंट मध्ये गार्निश करण्यात आलेले आहेत. व आपल्याला बॉडी कलर डोअर हँडल बघायला मिळतात. या गाडीच्या वरील बाजूस आपल्याला शार्क फिन अँटिना सुद्धा देण्यात आलेला आहे. कंपनीने आपल्याला इंटिग्रेटेड रूफ रेल सुद्धा दिलेले आहे. ड्युअल पॅनोरमिक सन रूप सुद्धा आपल्याला बघायला मिळते. हे सन रूफ फक्त (G1.5T) मध्ये उपलब्ध आहे.

या गाडीच्या कलर ऑप्शन बद्दल आपण जाणून घेऊयात. आपल्याला या गाडीमध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन कंपनीने दिलेले आहेत ते आहेत 1)Pearl White 2)Sparkling Sliver 3)Gravity White 4)Aurora Black Pearl 5)Ivory Silver Gloss 6)Imperior Blue 7)Pewter Olive.

या गाडीच्या इंटिरियर मध्ये सुद्धा आपल्याला दोन कलर ऑप्शन बघायला मिळतात ते आहेत Triton Navy and Beige Two Tone Interior.

Kia Carens Clavis Dimensions:

या गाडीच्या ओव्हर ऑल डायमेन्शन बद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत . या गाडीची लांबी 4550mm एवढी आहे तर या गाडीची जाडी 1800mm एवढी आहे. या गाडीचा व्हील बेस 2780mm एवढा आहे तर या गाडीची उंची 1708mm एवढी आहे.

Kia Carens Interior Design and Features:

या गाडीची इंटिरियर आपल्याला कलर ऑप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत जे आहेत की Triton Navy and Beige Two Tone Interior. चला तर मग आपण इंटरियर बद्दल माहिती जाणून घेऊयात. या गाडीचे डॅशबोर्ड आपल्याला Opulent Dashboard Garnish with Pad Print मध्ये बघायला मिळते. आतील बाजूंच्या डोअर हँडलला हायपर सिल्वर मेटॅलिक पेंट देण्यात आलेला आहे. या गाडीचे सीट आपल्याला Beige and Navy Leatherette मध्ये बघायला मिळतात. या गाडीच्या सेंटर कन्सोल मध्ये आपल्याला आम रेस्ट बरोबर कुलिंग कप होल्डर सुद्धा देण्यात आलेला आहे. या गाडीची स्टेरिंग व्हील ड्युअल टोन मध्ये बघायला मिळतील. या गाडीचे इंटिरियर अजून एक झकास फीचर मध्ये 64 कलरच्या ॲम्बिएंट लाइटिंग आपल्याला बघायला मिळतात जी की रात्रीच्या वेळेस खूपच असा सुंदर दिसतात. गाडीचे जे गिअर क्नॉब आहे ते पण लेदर पासून बनवलेले गेलेले आहे.

या गाडीची स्टेरिंग व्हील आपल्याला टिल्ट आणि टेलिस्कोप मध्ये आपण ऍडजेस्ट करू शकतो. गाडीची चारी काचा पावर विंडो आपल्याला बघायला मिळतात व त्यात स्विच इल्लुमिनिशन आहे. हेडलाईन लेव्हलिंग डिवाइस सुद्धा गाडी देण्यात आलेला आहे. पुढील दोन्ही दरवाजाच आपल्याला बॉटल होल्डर आणि छत्री होल्डर सुद्धा बघायला मिळतात. या गाडी ड्रायव्हर आणि पॅसेंजर साठी सनग्लास होल्डर , सन वायझर विथ युनिटी मिरर पॅसेंजर साठी उपलब्ध आहे तर सनवायझर टिकीट होल्डर ड्रायव्हर साठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. रिट्रॅक्टेबल रूप असिस्ट हॅन्डल सुद्धा देण्यात आलेला आहे. मागील दरवाजास रेड डोअर सन शेड कर्टन्स देण्यात आलेले आहेत. सीट बॅक पॉकेट आपल्याला पॅसेंजर आणि ड्रायव्हरच्या मागे देण्यात आलेले आहेत. गाडीचे पॅसेंजरचे सीट आपण सेकंड रो 60:40 या पद्धतीने स्पीड करू शकतो त्यात आपण स्लाइडिंग,रिप्लायिंग चा ऑप्शन आपल्याला देण्यात आले आहे. सेकंड रो मध्ये फोल्डिंग आम रेस्ट आपल्याला बघायला मिळतील. सेकंड ची अजून एक फीचर असे आहे ”वन टच इझी इलेक्ट्रिक टंबल”. गाडी सेव्हन सीटर असल्यामुळे थर्ड रो मध्ये 50:50 स्प्लिट या पद्धतीने आपण मागील सीट फोल्ड करू शकतो त्यात आपण रिप्लायने आणि फुल फ्लॅट फोल्डिंग करू शकतो. लगेज साठी आपल्याला सीटबॅक हुक सुद्धा देण्यात आलेले आहेत.फर्स्ट प्रो सेकंड थ्रो मध्ये आपल्याला ऍडजेस्टेबल हेड्रिट म्हणजे सगळ्या सीट साठी देण्यात आलेले आहेत. इलेक्ट्रिकल ऍडजेस्ट आऊटसाईड मिरर विथ ऑटो फोल्ड आणि एलईडी टन सिग्नल देण्यात आलेले आहेत.

चला तर मग या गाडीचे इन्फोटेनमेंट व त्यातले काही फीचर्स बद्दल आपण माहिती जाणून घेऊया. 31.12 cm(12.25) एचडी डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर आपल्याला देण्यात आलेला आहे व 31.12cm (26.25) एचडी टच स्क्रीन नेवीगेशन आपल्याला देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये आपल्याला ड्युअल पॅनोरमिक सन रूफ तब्बल 67.62 cm (26.62) एवढी देण्यात आलेली आहे. या गाडीचे आपल्याला साऊंड सिस्टिम बॉस मध्ये आठ स्पीकर गाडीमध्ये देण्यात आलेले आहे. यूएसबी टाइप ए मीडिया पोर्ट व त्याचबरोबर सी टाईप यु एस बी फर्स्ट प्रो सेकंड रोड मध्ये उपलब्ध आहेत. वायरलेस फोन प्रोजेक्शन, ब्लूटूथ हॅन्ड फ्री, व्हॉइस रिक्नायझेशन, ऑटो हेड लॅम, स्मार्ट क्रूज कंट्रोल, स्मार्ट एअर पुरिफायर, स्मार्ट डॅश कॅमेरा विथ ड्युअल कॅमेरा इत्यादी असे भरपूर सारे फीचर्स आपल्याला बघायला मिळतात.

Safety Features:

सेफ्टी मध्ये कंपनीने आपल्याला खूप सारे फीचर्स दिलेले आहेत ते आहेत फ्रंट ड्युअल एअरबॅग, फ्रंट साईड एअरबॅग, साईट कर्टन एअर बॅग, एबीएस, ब्रेक असिस्ट सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, डाऊन हिल ब्रेक कंट्रोल, टायर प्रेशर सेन्सर्स, स्पीड सेंसिंग ऑटो डोअर लॉक, इम्पॅक्ट सेंसिंग ऑटो डोआर लॉक, ऑल सीट थ्री पॉईंट सिट बेल्ट, सगळ्या चाकांना डीस ब्रेक, लेवल टू, फ्रेंड कोलीजन वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा इत्यादी असे भरपूर सारे फीचर्स सेफ्टीच्या दृष्टीने आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतात.

Varients With Seating Plans:

Powertrain Options Seating Plan HTE HTE(O) HTK HTK+ HTK+(O) HTX HTX+
Smartstream G1.5 T-GDi 7DCT 7
Smartstream G1.5 T-GDi 6iMT 7
Smartstream G1.5 T-GDi 6MT 7
Smartstream G1.5 6MT 7
1.5L CRDi VGT 6AT 7
1.5L CRDi VGT 6MT 6/7

तर आम्हाला नक्की सांगातुम्हाला या गाडीबद्दलची माहिती कशी वाटली.आणि या गाडीबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा.

जर का तुम्हाला टाटा अल्ट्रोज या गाडी बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *