Best Selling Cars in November 2025
नमस्कार मित्रांनो आज आपण भारतामध्ये नोव्हेंबर महिन्यात विकले गेलेला टॉप 10 कार्स बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये कॉम्पॅक्ट एस यु व्ही आणि हॅचबॅक या गाड्यांनी नोव्हेंबर महिन्यात मार्केटला डॉमिनेट केलं सेल्समध्ये. आपण नोव्हेंबर महिन्यातील टॉप 10 बेस्ट सेलिंग कार पाहणार आहोत दहा नंबर पासून ते एक नंबर पर्यंत त्याचबरोबर आपण त्या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जसे की गाडीच्या किती युनिट विकले गेलेले आहेत गाडीच्या इंजिन बद्दल माहिती गाडीच्या किमती बद्दल माहिती बूट स्पेस इत्यादी चला तर मग सुरु करूयात
10) Maruti Brezza
दहाव्या नंबरला मारुती ब्रीजा गाडी आहे. या गाडीचे तब्बल 13,947 युनिट्स भारतामध्ये विकलेले गेलेले आहे. ही गाडी इंडिया मधील सर्वात जास्त विश्वासू कॉम्पॅक्ट गाडी आहे. या गाडीने सेल्स मध्ये नोव्हेंबर महिन्यात दहावा नंबर मिळवला. या गाडीची डिमांड भारतामध्ये खूपच जास्त अशी आहे कारण ती खिशाला पडवणारी आहे. या गाडीची खासियत म्हणजे ही गाडी सामान्य जनतेला खूपच अशी आवडते कारण या गाडीत आपल्याला सीएनजीचा सुद्धा ऑप्शन मिळतो पेट्रोल सोबत. ही गाडी शहरात आणि गावाकडच्या खेड्यात खूपच मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते.
या गाडीची सध्याची जनरेशन दुसरी आहे. ची गाडी 2022 मध्ये भारतामध्ये लॉन्च करण्यात आली होती व या गाडीचे फेसलिफ्ट मॉडेल आपल्याला 2024 मध्ये बघायला भेटली. या गाडीमध्ये आपल्याला 1.5L K15C Petrol इंजिन बघायला मिळते. हे मारुती सुझुकीचे के सिरीज मधील इंजिन आहे. या इंजिनची पावर 103 पी एस एवढी आपल्याला बघायला मिळते. या गाडीचे ट्रान्समिशन फाईव्ह स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक आपल्याला भेटते. म्हणजेच तुमच्या गरजेनुसार तुम्ही गाडी ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल मध्ये घेऊ शकता. या इंजिन सोबत आपल्याला गाडीचे मायलेज 20km/l एवढी अशी मिळते. विकी खूपच चांगली आहे. ब्रेजा मध्ये आपल्याला प्रीमियम ड्युअल टोन केबिन, नऊ इंचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम ज्यात आपण अँड्रॉइड ऑटो एप्पल कार प्ले, हिट्स अप डिस्प्ले, क्रूज कंट्रोल आणि फ्लॅट बॉटम स्टेरिंग व्हील असे भरपूर सारे फीचर्स मिळतात
या गाडीची बाहेरची डिझाईन खूपच अशी बोल्ट स्वरूपात आहे. समोरच्या बाजूला आपल्याला एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएस, स्ट्रॉंग बॉडी क्लीडींग, आणि स्टायलिश ड्युअल टोन अलाईव्ह व्हील बघायला मिळतात. या गाडी मध्ये आपल्याला तब्बल 228 लिटरचा बूट स्पेस बघायला मिळतो. या गाडीची टायरची साईज 215/60 R16 एवढी आहे. सर्वात महत्त्वाचं या गाडीची किंमत ₹8.5 लाख ते ₹14.1 लाख एक्स शोरूम आपल्याला बघायला मिळते. लोकं ही गाडी रिलेबिलिटी, लो मेंटेनन्स आणि मारुती वरचा विश्वास व त्यांचे सर्विस नेटवर्क त्यामुळे सर्वात जास्त विकत घेतात.
9) Maruti Wagon R
मारुती सुझुकी वॅगनर चे तब्बल नोव्हेंबर 2025 मध्ये 14,619 युनिट विकलेले गेलेले आहेत. या गाडीवर भारतातील जनतेचा खूपच असा विश्वास आहे. या गाडीचे आपल्याला टोल बॉय डिझाईन, खूपच चांगली फ्यूल एफिशियन्सी आणि एफओरदिबिलिटी प्राईसिंग मध्ये त्यामुळे ही गाडी भारतातील लोकांसाठी खूपच अशी चांगली चॉईस आहे ही गाडी शहरात आणि छोट्या फॅमिली साठी खूपच अशी चांगली आहे. या गाडीची सध्याचे जनरेशन तिसरे आहे. ही गाडी ची तिसरी जनरेशन 2019 मध्ये लाँच झाली होती व ही गाडी 2024 मध्ये आपल्याला अपडेट करण्यात आली.
या गाडीमध्ये आपल्याला दोन इंजिन ऑप्शन मिळतात जे आहेत 1) 1.0L Petrol 2) 1.2L Petrol. हे इंजिन 67 आणि 90 पी एस एवढे पावर जनरेट करतात जे मायलेज साठी खूपच अशी चांगली आहे. या गाडीमध्ये आपल्याला फाईव्ह स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते. या गाडीचे पेट्रोल वरची मायलेज 24.4 किलोमीटर पर लिटर व सीएनजी ची मायलेज 25.19 किलोमीटर आपल्याला बघायला मिळते जी की सेगमेंट मध्ये खूपच अशी चांगली आहे. त्या गाडीचे केबिन खूपच असे स्पेसिअस आहे व उंचाचा हेड रूम आहे.
या गाडीमध्ये आपल्याला सात इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम , स्टेरिंग माऊंटेड कंट्रोल्स आणि स्टोरेज स्पेसेस खूप सारे मिळतात. या गाडीचे बाहेरून डिझाईन खूपच अशी साधी आहे व आपल्याला बॉडी कलर बंपर, हॅलोजन हेडलाईन्स आणि स्टील किंवा आलोय चा व्हील ऑप्शन मिळतो. या गाडीमध्ये आपल्याला तब्बल 341 लिटर एवढा बूट स्पेस मिळतो. या गाडीचे टायरची साईज 165/70 R14 एवढी आपल्याला बघायला मिळते. या गाडीची एक्स शोरूम किंमत ₹5.5 लाख ते ₹7.4 लाख एवढी आहे.
8) Maruti Fronx
नोव्हेंबर महिन्यात आठव्या नंबरला आपल्याला मारुती सुझुकी फ्रॉम्स ही गाडी पाहायला मिळते. ही गाडी यंग लोकांना टार्गेट करण्यासाठी बनवलेले आहे कारण या गाडीची डिझाईन खूपच अशी स्पोर्टी आहे व स्टायलिंग आणि दमदार असे मायलेज या गाडीमध्ये आपल्याला मिळते. नोव्हेंबर 2025 मध्ये या गाडीचे तब्बल 15,058 युनिट्स विकले गेलेले आहेत जी की खूपच अशी चांगली गोष्ट आहे. लोक या गाडीला फीचर्स आणि टाटाच्या मजबुतीसाठी विकत येतात. या गाडीमध्ये आपल्याला खूपच अशी सेफ्टी मिळते. ही गाडी 2023 मध्ये लॉन्च करण्यात आली होती व सध्याचे या गाडीचे पहिले जनरेशन आहे.
या गाडीमध्ये आपल्याला दोन इंजिन ऑप्शन मिळतात ते आहेत 1)1.2 NA Petrol 2) 1.0L Turbo Petrol . हे इंजिन तब्बल 90 आणि 100 पीएस एवढी पावर जनरेट करतात. ही गाडी आपल्याला मॅन्युअल ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये बघायला मिळते. या गाडीची मायलेज आपल्याला हायवेवर 22.9 किलोमीटर पर लिटर एवढी अशी दमदार मिळते. या गाडीची इंटिरियर खूपच असे प्रीमियम आहे इंटेरियर मध्ये आपल्याला नऊ इंच स्मार्ट प्ले इन्फोटेक मे सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले मिळते. गाडीचे बाहेरचे डिझाईन कुपे या डिझाईन इन्स्पायर आहे.
गाडीच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला एलईडी डी आर एल, बॉडी ग्रील आणि स्फूर्ती आलोय व्हील बघायला मिळतात. ही गाडी खूपच अशी प्रॅक्टिकल आहे कारण या गाडीमध्ये आपल्याला तीनशे आठ लिटरचा बूट स्पेस बघायला मिळतो व या गाडीचे टायरची साईज आपल्याला 195/60 R16 एवढी पाहायला मिळते. या गाडीची एक्स शोरूम किंमत साडेसात लाखापासून सुरू होते व 13 लाखापर्यंत जाते.
7) Mahindra Scorpio N
नोव्हेंबर महिन्यात सर्वात जास्त विकले गेलेल्या गाड्यांमध्ये सातव्या नंबरला आपल्याला ऑफरोडिंग किंग महिंद्रा स्कॉर्पिओ एन बघण्यास मिळते. ही गाडी आपल्या पावरफुल इंजिन, रोड प्रेसन्स, ऑफरोडिंग केपीबिलिटी साठी ओळखली जाते. तरुणाई मध्ये या गाडीचा जसा शॉक आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये या गाडीचे तब्बल 15,616 युनिट्स भारतामध्ये विकले गेलेले आहेत.
ही गाडी 2022 मध्ये नवीन जनरेशन मध्ये लॉन्च करण्यात आलेले होते व तिचे सध्याचे मॉडेल स्कॉर्पिओ एन आहे. या गाडीमध्ये आपल्याला दोन इंजिन ऑप्शन बघायला मिळतात जे आहेत 1)2.0L Turbo Petrol (200 PS) 2)2.2L Diesel (175 PS) ही गाडी आपल्याला रियर व्हील ड्राईव्ह आणि फोर बाय फोर मध्ये मिळते. या गाडीचे ट्रांसमिशन आपल्याला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल या स्वरूपात मिळते. इंटेरियर मध्ये मोठी टच स्क्रीन, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, प्रीमियम सीड्स भेटतात. या गाडीमध्ये आपल्या तब्बल 460 लिटरचा बूट स्पेस बघायला मिळतो, या गाडीचे टायरची साईज 255/60 R16 एवढी आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत आपल्याला ₹13.6 lakh – ₹24.5 lakh एवढी बघायला मिळते.
6) Maruti Ertiga
मारुती सुझुकी ईरटीका या गाडीचे तब्बल नोव्हेंबर 2025 मध्ये 16197 युनिट विकले गेलेले आहेत. ही गाडी आपल्या सिव्हिल सीटर साठी फेमस असून खूपच असा स्पेस कंफर्ट आणि फ्युल एफिशियन्सी ग्राहकांना प्रदान करते. ही गाडी 2018 मध्ये लॉन्च झालेली होती व तिचे फेसलिफ्ट आपल्याला 2022 मध्ये पाहायला भेटले. या गाडीमध्ये आपल्याला एक पॉईंट पाच लिटरची पेट्रोल इंजिन बघायला मिळते. हे पेट्रोल इंजिन सीएनजी मध्ये आपल्याला 26.11 किलोमीटर एवढे मायलेज देते. या गाडीमध्ये आपल्याला तब्बल 209 लिटर्सचा बूट स्पेस बघायला मिळतो. व या गाडीची एक्स शोरूम किंमत ₹8.7 – ₹13.0 lakhएवढी आहे.
5) Hyundai Creta
आपल्या सर्वांची लाडकी क्रेटा गाडी आहे. या गाडीचे नोव्हेंबर महिन्यात तब्बल 17,344 युनिट्स संपूर्ण भारतामध्ये विकलेले गेले आहेत. या गाडीने मेड साईज एसयूव्ही चे मार्केट डॉमिनेट केलेले आहे त्याच्या स्टाईल प्रीमिय फीचर्स नी. या गाडीचे फेसलिफ्ट आपल्याला 2024 मध्ये पाहायला मिळाले होते. या गाडीत आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचे इंजिन ऑप्शन्स बघायला मिळतात. या गाडीमध्ये खूपच असेल प्रेमियम फीचर्स आहेत आणि खूपच असा जबरदस्त इन्फोटेनमेंट सिस्टीम या गाडीमध्ये उपलब्ध आहे. गाडी चालवण्यासाठी खूपच अशी चांगली मानली जाते. या गाडीमध्ये आपल्याला 433 लिटरचा खूपच असा मोठा बूट स्पेस बघायला मिळतो. या गाडीची एक शोरूम किंमत ₹11 – ₹20 lakh एवढी आहे.
4) Tata Punch
भारतातील सर्वात जास्त लोकांना आवडणारी गाडी म्हणजे टाटा पंच. ही गाडी आपल्याला पेट्रोल आणि इलेक्ट्रिक मध्ये उपलब्ध आहे. या गाडीचे नोव्हेंबर 2025 मध्ये तब्बल 18753 युनिट्स संपूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत. ही गाडी सेफ्टी मध्ये खूपच अशी दमदार आहे. लोकही गाडी खूप जास्त विकत घेण्याचे कारण म्हणजे टाटाची फाईव्ह स्टार सेफ्टी, आणि टफ बोल्ड कॉलिटी. ही गाडी 2021 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. ही गाडी आपल्याला एक पॉईंट दोन लिटर पेट्रोल इंजिन मध्ये उपलब्ध आहे. या गाडीला फाईव्ह स्टार ग्लोबल एन कॅप एवढी जबरदस्त सेफ्टी मध्ये रेटिंग मिळालेली आहे. या गाडीमध्ये आपल्याला तब्बल 366 लिटरचा बूट स्पेस बघायला मिळतो. या गाडीचे टायरची साईज 195/60 R 16 एवढी आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत ₹6 – ₹10.2 lakhएवढी आहे.
3) Maruti Swift
लोकांमध्ये खूप अशी फेमस असलेली मारुती सुझुकी स्विफ्ट गाडी आहे. या गाडीचे नोव्हेंबर महिन्यात तब्बल 19,733 युनिट्स भारतामध्ये विकले गेलेले आहेत. ही गाडी तरुणाई मध्ये खूपच अशी प्रसिद्ध आहे. छोटे फॅमिली साठी ही गाडी कशाला परवडणारी आहे कारण या गाडीचे थ्री सिलेंडर इंजिन खूपच असे दमदार मायलेज प्रदान करते. ही गाडी सध्या मार्केटमध्ये आपल्याला चौथ्या जनरेशन मध्ये उपलब्ध आहे. या गाडीचा परफॉर्मन्स खूपच असा चांगला आहे व डिझाईन स्पोर्टी आहे. या गाडीची इंजिन आपल्याला 1.2L Z Series मध्ये पाहायला मिळते. ही गाडी पेट्रोल वरती २५.७५ किलोमीटर पर लिटर एवढी मायलेज देते व सीएनजी वरती 33 किलोमीटर पर केजीचे मायलेज आपल्याला देते जे की सेगमेंट मध्ये खूपच जास्त आहे. मध्ये आपल्याला 265 लिटरचा बूट स्पेस बघायला मिळतो. या गाडीचे टायरची साईज 185/65 R 15 एवढी आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत आपल्याला ₹6.5 – ₹9.6 lakh एवढी बघायला मिळते.
2) Maruti Dzire
नोव्हेंबर 2025 मध्ये दुसऱ्या नंबरला सर्वात जास्त विकणारी गाडी म्हणजे मारुती सुझुकी डिजायर. ही गाडी नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल 21082 एवढे युनिट्स या गाडीचे विकले गेलेले आहेत. ही गाडी आपल्याला सहज शहरांमध्ये पाहायला मिळते. ही गाडी टॅक्सी मध्ये खूपच अशी जास्त वापरली जाते शहरांमध्ये. या गाडीचे नवीन जनरेशन आपल्याला 2024 मध्ये पाहायला मिळाले होते . या गाडीचे इंजिन आपल्याला 1.2L Petrol मध्ये उपलब्ध आहे. ही गाडी आपल्याला पेट्रोल आणि सीएनजी वर सुद्धा चालू शकतो. या गाडीचे पेट्रोल वरचे मायलेज 25.7 किलोमीटर पर लिटर एवढी आहे. या गाडीमध्ये आपल्याला तब्बल 378 लिटर्स एवढा बूट स्पेस बघायला मिळतो. या गाडीची टायरची साईज 185/65 R15 एवढी आहे. या गाडीची एक शोरूम किंमत आपल्याला ₹6.8 – ₹10.1 lakh एवढी बघायला मिळते.
3)Tata Nexon
नोव्हेंबर 2025 मध्ये सर्वात जास्त विकलेल्या गेलेल्या गाड्यांमध्ये एक नंबर चा क्रमांक टाटा नेक्सन या गाडीने पटकावलेला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये या गाडीचे तब्बल 22434 युनिट्स संपूर्ण भारतामध्ये विकलेले गेलेले आहेत. इतके जास्त विक्रीचे कारण म्हणजे टाटाची सेफ्टी डिझाईन आणि मल्टिपल पॉवर ट्रेन ऑप्शन्स. या गाडीचे आपल्याला फेसलिफ्टचे मॉडेल 2023 मध्ये पाहायला मिळाले होते. ही गाडी आपल्याला पेट्रोल डिझेल आणि इलेक्ट्रिक मध्ये उपलब्ध आहे. या गाडीला सेफ्टी मध्ये फाईव्ह स्टार भारत एन कॅप एवढी रेटिंग मिळालेली आहे. या गाडीमध्ये आपल्याला 382 लिटरचा बूट स्पेस बघायला मिळतो. या गाडीची टायरची साईज 215/60 R16 एवढी आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत आपल्याला ₹8 – ₹15.6 lakh एवढी बघायला मिळते.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टाटा सियारा या गाडीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
किया सेल्टोस या गाडी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा