इ व्ही कार्स

Mahindra XEV 9e Launched at ₹21.90 lakh :महिंद्राची दमदार इलेक्ट्रिक गाडी भारतात लॉन्च

Mahindra XEV 9e Exterior Design:

ही महिंद्राची गाडी 2024 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. ही या गाडीचा फर्स्ट जनरेशन मॉडेलच आहे. ही गाडी महिंद्राच्या इंग्लो या प्लॅटफॉर्म वरती बनलेली आहे. ही गाडी जर का आपण घेतली तर बॅटरी वरती आपल्याला लाईफ टाईम वॉरंटी मिळते. या गाडीसोबत आपल्याला 11KW चा चार्जर मिळतो. ही गाडी महिंद्रा इंटेलिजंट आर्किटेक्चर हे सॉफ्टवेअर वापरते. महिंद्रा कंपनीने ही गाडी इंटरनॅशनल मार्केटला टार्गेट करण्यासाठी बनवलेली आहे. या गाडीमध्ये आपल्याला पाच रडार आणि एक विजन कॅमेरा बघायला मिळतो. या गाडीमध्ये ADAS लेवल टू बघायला मिळते. ही गाडी रियर व्हील ड्राईव्ह मध्ये उपलब्ध आहे. या गाडीच्या काचांमध्ये आपल्याला 95.5% युवी फिल्टरेशन बघायला मिळते. ही गाडी आपण एका पेडल वापरून चालू शकतो. या गाडीमध्ये आपल्याला महिंद्रा कंपनीचा नवा लोगो बघायला मिळतो. या गाडीमध्ये खूपच चांगले हेडलाईन्स बघायला मिळतात यामध्ये डी आर एल आणि सिक्वेन्शियल हेडलाइट्स मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला रेन सेंसिंग वायपर सुद्धा बघायला मिळतो. गाडीच्या वरील बाजूलाच ग्लास रूप आणि शार्क फिन अँटिना देण्यात आलेला आहे.

या गाडीची बाहेरील मिरर इलेक्ट्रिक ऍडजेस्टेबल आहेत त्यामध्ये आपल्याला टर्न इंडिकेटर आणि कॅमेरा देण्यात आलेला आहे. या गाडीची एसयूव्ही कुपे डिझाईन आहे. या गाडीची लांबी 4.8 मीटर एवढी आहे तर जाडी 1.9 मीटर एवढी आहे. या गाडीची उंची 1.7 मीटर एवढी आहे. या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स 218 एम एम एवढा आहे. या गाडीमध्ये 19 इंच व 20 इंच एलर्व्हिल आपल्याला बघायला मिळतात. या गाडीमध्ये चारी चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत. या गाडीच्या चाकांची साईज 245 55 R19 ही टायर साईज देण्यात आलेली आहे. ही चाकी ट्यूबलेस मध्ये आहेत. या गाडीमध्ये आपल्याला चार कलर पेंट बघायला मिळतात रेड ,गोल्ड ,ब्लॅक आणि व्हाईट हे कलर्स गाडीमध्ये बघायला मिळतात.

या गाडीमध्ये आपल्याला तीन ड्राइव्ह मोड बघायला मिळतात रेंज ,एव्हरीडे आणि रेस . या गाडीमध्ये बॅटरी खालील बाजूला देण्यात आलेले आहे. गाडीच्या मागील बाजूस आपल्याला XEV 9E चीबेजिंग आणि महिंद्राचा लोगो बघायला मिळतो. मागील बाजूला रियल कॅमेरा आणि लाईटची स्ट्रीप देण्यात आलेली आहे. एलईडी टेल लॅम्प सुद्धा मागील बाजूस उपलब्ध आहे. गाडीची चार्जिंग स्पोर्ट आपल्याला डिक्कीच्या शेजारी देण्यात आलेले आहेत. यामध्ये आपण एसी आणि डीसी या पद्धतीने चार्जिंग करू शकतो. कनेक्टिव्हिटी आणि रियल टाईम अपडेट साठी वायफाय 6.0 आणि ब्लूटूथ 5.0 हे देण्यात आलेला आहे हे या गाडीमध्ये अडास लेवल टू प्लस आणि आयक्यू सिक्स ची टू जीबी रॅम आणि आठ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहेत. थ्री सिक्सटी कॅमेरा सुद्धा या गाडीमध्ये आपल्याला बघायला मिळतो जी गाडीच्या आजूबाजूची सगळे रेकॉर्डिंग करते.

या गाडीमध्ये आपल्याला रिव्हर्स असिस्ट बरोबर बारा अल्ट्रासोनिक सेन्सर्स देण्यात आलेले आहेत. आपल्याला रिमोट कंट्रोल पार्किंगचे पण ऑप्शन बघायला मिळतात. केबिन शांत ठेवण्यासाठी एन व्ही एच फोम्स गाडीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. ट्वेल अल्ट्रासोनिक सेन्सर्स पाच रडार आणि सहा कॅमेरा या गाडीमध्ये आहेत. या गाडीच्या सेफ्टी मध्ये आपल्याला सात एअर बॅग , 3 पॉईंट सीट बेल्ट , साईट क्रॅश प्रोटेक्शन, फ्रंटल क्रॅश प्रोटेक्शन, वर्चुअल इंजिन साउंड, इलेक्ट्रॉनिक ब्रेक बूस्टर, ड्रायव्हर डाऊझिंग डिटेक्शन आणि टायर प्रेशर इंडिकेटर बघायला मिळतात. एन एफ सी की कार्डचा सुद्धा ऑप्शन आहे.

Mahindra XEV 9e Image:

Mahindra XEV 9e

Mahindra XEV 9e Interior Design:

या गाडीमध्ये 663 लिटर ची बूट स्पेस देण्यात आलेली आहे. बूट मध्ये आपल्याला बूट कव्हर, सीट फोल्ड करण्याची बटन, लाईट, बारा वोल्टचा पोर्ट, हूक्स, स्पेअर विल, टूलकिट, चार्जिंग केबल, बूट कव्हर एवढ्या गोष्टी बघायला मिळतात. बूट बंद करण्यासाठी एक टच चा ऑप्शन देण्यात आलेला आहे. 16 स्पीकर 1400 व्हॉटचा हरमन कार्ड साऊंड सिस्टिम देण्यात आलेला आहे. मागील सीटच्या दरवाज्यापाशी आपल्याला बॉटल होल्डर देण्यात आलेला आहे. या गाडीच्या काचनमध्ये सन शेड सुद्धा उपलब्ध आहे. या गाडीची सीट आपल्याला लेदर मध्ये बघायला मिळतात. मागील सीट 60-40 या पद्धतीने सुद्धा फोल्ड होऊ शकतात. मागील सीट साठी दोन एसीमेंट यूएसबी पोर्ट सुद्धा देण्यात आलेले आहेत. मागील स्विच च्या पॅसेंजर साठी वायरलेस चार्जर सुद्धा उपलब्ध आहे. या गाडीची स्क्रीन 43.3 इंच ची स्क्रीन देण्यात आलेली आहे. मागील सीट मध्ये आमरेस्ट देण्यात आलेले आहे. पुढील पॅसेंजर साठी सुद्धा दरवाजावरती बॉटल होल्डर विंडोज अपडाऊन चे बटन देण्यात आलेले आहे. पुढील पॅसेंजर साठी आपल्याला 12.3 इंचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. पुढील पॅसेंजर पासून ग्लोब बॉक्स लाईट बरोबर देण्यात आलेले आहे.

या गाडीमध्ये आपल्याला तीन मेमरी सीट चे फंक्शन्स बघायला मिळतात. हाईट ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट देण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिक पॉवर स्टेरिंग आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आपल्याला बघायला मिळतात. ऑटो होल्डचं सुद्धा फीचर्स देण्यात आलेला आहे. ड्रायव्हरला वायरलेस चार्जर आणि दोन यूएसबी पोर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. या गाडीचा डिस्प्ले एप्पल कार प्ले अँड्रॉइड ऑटो आणि खूप सारे फीचर्स सपोर्ट करतो.

या डिस्प्ले मध्ये साठ हून अधिक ॲप्स आपल्याला देण्यात आलेले आहेत. फुल्ली ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल एसी देण्यात आलेला आहे. आपल्या या गाडीमधून एअर क्वालिटी सुद्धा बघायला मिळते. 360 कॅमेराच्या माध्यमातून आपण थ्रीडी कॅमेरा व्ह्यू गाडीचा बघू शकतो. गाडीमध्ये इंटेरियर मध्ये अंबाइंत लायटिंग सुद्धा देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये ग्रू मी हे फीचर देण्यात आलेला आहे. या फीचरच्या माध्यमातून आपण एलईडी लाईट शो चा आनंद घेऊ शकतो म्हणजेच गाडीच्या संपूर्ण चारी बाजूची लाईट यांनी ग्लो होऊन जाते.

या गाडीमध्ये सुरक्षेसाठी सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला आहे तो कॅमेरा ड्रायव्हरला कंटिन्यूअस मॉनिटरिंग करत राहतो जर का ड्रायव्हर झोपी जाण्याच्या शक्यता असेल तर तो ड्रायव्हरला वार्निंग देत राहतो. या कॅमेरा द्वारे तुम्ही स्वतःचा फोटो व व्हिडिओ काढू शकता. खूपच चांगली अशी डॅशबोर्डची फिनिश आपल्याला बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला व्हिजन एक्स हेड उप डिस्प्ले हा डिस्प्ले समोरच्या काचेवर पडतो व आपल्याला स्पीड आणि भरपूर सारी माहिती देतो. ऑटो डीम रियर व्ह्यू मिरर गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. इमर्जन्सी स ओ स बटन केबिनमध्ये देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला स्टेरिंग मध्ये तील्ट आणि टेलिस्कोप या पद्धतीचे बघायला मिळते. स्टेरिंग वरती आपल्याला फोन इन्फोटेकमेन्ट वोल्युम आणि व्हाईस कंट्रोल क्रूस कंट्रोल पेडल शिफ्टर बघायला मिळतात.गाडीच्या पुढील बोनेट म्हणजेच फ्रंट मध्ये 150 लिटर स्पेस बघायला मिळते.

Mahindra XEV 9e Battery Information:

या गाडीची बॅटरी आपल्यालाBYD 59 kW hr लिथियम फैरोफोस्फते ल एफ प बॅटरी. ही गाडी तब्बल 288 हॉर्स पावर 380NM टॉर्क जनरेट करते. या गाडीची रेंज तब्बल 542 किलोमीटर एवढी देण्यात आलेली आहे. 7.2KW AC चार्जर पासून आपण ही गाडी आठ तासांमध्ये ही गाडी चार्ज करू शकतो. या गाडीमध्ये आपल्याला बी वाय डी या कंपनीची बॅटरी बघायला मिळते.

तर आम्हाला नक्की सांगा तुम्हाला या गाडीबद्दल काय वाटते ती कमेंट सेक्शन मध्ये.जर का तुम्हाला या गाडीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा.

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *