Royal Enfield Bear 650 :रॉयल एनफिल्ड या कंपनीची सर्वात भारी बाईक?
Royal Enfield Bear 650 Specs:
रॉयल एनफिल्ड बियर ६५० ही गाडी रॉयल इन्फिल्ड कंपनी द्वारे सर्वात चांगली गाडी देण्यात आलेली आहे. ही गाडी इंटरसेप्टर प्लॅटफॉर्म च्या वरती बनवलेले गेलेले आहे. या गाडीत समोरची चाक 19 इंच चे देण्यात आलेला आहे व मागील चाक 17 इंच देण्यात आलेले आहे. या गाडीची सस्पेन्शन ट्रॅव्हल 130mm(f) 115 mm(R) एवढे देण्यात आलेले आहे. या गाडीचे सीट थोडेसे वेगळे देण्यात आलेले आहे. या गाडीचे फ्रेम मजबूत देण्यात आलेले आहे. या गाडीच्या हाईट थोडीशी वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे रायडर ची उंची असणे गरजेचे आहे. पण या गाडीची सेटिंग पोझिशन एकदम कम्फर्टेबल आहे. गाडीच्या फुटरेस्टमुळे ड्रायव्हरला कन्फर्ट मिळतो रायडींग साठी. या बाईक ची सीट हाईट 830mm एवढी आपल्याला बघायला मिळते.
या गाडीत फक्त आपल्याला साईटची स्टॅन्ड मिळते मधली स्टॅन्ड मिळत नाही. या गाडीचे टोटल वजन 216 किलो एवढे आपल्याला बघायला मिळते. जेव्हा आपले स्पीड कमी असते तेव्हा ही बाईक किती जड आहे ते आपल्याला जाणवते. या बाईचे हँडलिंग खूपच अशी चांगली आहे. ही गाडी 140 km/hr एवढ्या गती सुद्धा स्टेबल राहते. या गाडीचे विल बेस आपल्याला 1460mm एवढं बघायला मिळतो. या बाईक मध्ये आपल्याला एमआरएफ कंपनीचे NYLOREX हे टायर्स बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला दोन्ही चाकांना डीस ब्रेक बघायला मिळतात. हाय स्पीड मध्ये आपल्याला हे ब्रिक्स खूप कमी येतात.
या बाईकची पुढील चाकाची टायर साइज 100/90-19 तर मागील चाकाची 140/80-R17 एवढी देण्यात आलेली आहे. या गाडीचे पुढील ब्रेक 320mm disc तर मागील ब्रेक 270mm disc एवढे देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये आपल्याला ABS ही ब्रेकिंग सिस्टीम बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला डबल चॅनेल स्विचेबल एबीएस बघायला मिळतो.
Royal Enfield Bear 650 Engine:
या बाईकमध्ये खूपच दमदार असे इंजिन आपल्याला देण्यात आलेले आहे. या इंजिन मध्ये आपल्याला दोन सिलेंडर बघायला मिळतात. हे इंजिन तब्बल 648cc ची आहे. या इंजिन मध्ये आपल्याला हवा आणि ऑइल या पद्धतीची कुलिंग सिस्टीम बघायला मिळते. या गाडीची पॉवर आउटपुट आपल्याला 47.5 hp बघायला मिळते आणि 7150rpm एवढ्या पर्यंत ही गाडी जाऊ शकते. या गाडीमध्ये आपल्याला 56.5Nm आणि 5150rmp एवढा गाडीचा टॉर्क बघायला मिळतो. ही गाडी सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्स मिशन मध्ये येते म्हणजेच या गाडीत सहा गिअर देण्यात आलेले आहेत. या गाडीचे परफॉर्मन्स बघायला गेले तर 0-60kph फक्त 2.73s गाडी एवढे स्पीड आहे. 100 ची स्पीड फक्त 5.84s मध्ये अचिव करते. हायवे वरती ही गाडी खूप चांगल्या पद्धतीने चालते.
जर का तुम्हाला या गाडीमध्ये ऑफरोडींग करायची असेल तर तुम्ही करू शकता. कारण या गाडीमध्ये तुम्हाला 184mm चा ग्राउंड क्लिनरस देण्यात आलेला आहे आणि या गाडीची ऑफ रोडींग कॅपॅबिलिटी खूपच चांगली आहे.
Royal Enfield Bear 650 Image:
Royal Enfield Bear 650 Price and Features:
या गाडीची एक्स शोरूम किंमत आपल्याला 3.39lakh-3.59la
kh एवढी भारतामध्ये बघायला मिळते. या बाईक ची किंमत आपल्याला थोडी जास्त आहे पण या गाडीमध्ये आपल्याला स्टायलिश लुक आणि खूप सारे फीचर्स बघायला मिळतात. या गाडीमध्ये टोटल आपल्याला पाच कलरचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. आपल्याला या गाडीमध्ये टीएफटी सुद्धा बघायला मिळतो.
जर का तुम्हाला या गाडी बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही रॉयल इन्फिल्डच्या ऑफिशियल पेजला विजिट करू शकता ऑफिशियल पेज ला विजीट करण्यासाठी येथे क्लिक करा.
जर का तुम्हाला होंडा एक्टिवा ई या स्कूटर बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा.
तर तुम्हाला ही बाईक कशी वाटली आम्हाला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा.धन्यवाद.