Tata Sierra 2025
Tata Sierra 2025 Introduction:
नमस्कार मित्रांनो आज आपण टाटा सियारा या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही गाडी भारतामध्ये सध्या लॉन्च झालेली आहे. ही एक इंडियन क्रॉस ओवर एसयूव्ही आहे ही गाडी 1991 मध्ये लॉन्स झालेले होती आणि 2025 मध्ये या गाडीची सेकंड जनरेशन आलेले आहे. ही गाडी पेट्रोल आणि डिझेलमध्ये उपलब्ध आहे. या गाडीची किंमत सुरू होते 11 लाख 40 हजार ते 21 लाख 29 हजार रुपये. एक गोष्ट लक्षात ठेवा ही गाडीची एक्स शोरूम किंमत आहे. आपण या गाडीच्या टॉप व्हेरियंट एकॉम्प्लिश बद्दल आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
या गाडीवरती आपल्याला तीन वर्ष व एक लाख किलोमीटरची वॉरंटी मिळते. सियारा हे एक स्पॅनिश शब्द आहे ज्याचा अर्थ पर्वत रांगा असा होतो. या गाडीची असेंबली गुजरात मध्ये होते. ही गाडी इंडिया मध्ये सर्वात फेमस एसयूव्ही मध्ये मोडते.
Exterior Design:
चला तर मग या गाडीचे एक्स्टेरियल डिझाईन मध्ये काय काय फीचर्स आहेत व त्याचे डिझाईन कशी आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.या गाडीत आपल्याला समोरच्या बाजूला फ्रंट सेन्सर दिलेले आहेत. गाडीचे समोरची डिझाईन खूप असे आकर्षक आहे. समोरच्या बाजूला सिल्वर फिनिश स्कीट प्लेट सुद्धा देण्यात आलेले आहे. व टाटा मोटर्सचा लोगो आपल्याला बघायला मिळतो आणि सियाराची बॅजिंग सुद्धा बघायला मिळते. गाडीच्या समोर आपल्याला एक कॅमेरा व एलईडी सिक्वेन्शिअल डी आर एल सुद्धा देण्यात आलेला आहे. त्या डी आर एल मध्ये वेलकम आणि गुड बाय ॲनिमेशन आहे. समोरच्या खालच्या बाजूला एलईडी फॉग लॅम्प कॉर्नरिंग फंक्शन बरोबर देण्यात आलेला आहे. या गाडीची एलईडी खूपच जबरदस्त आहे ती आहे नाईट सेवर बाय एलईडी बूस्टर ऑटोमॅटिक हेडलाईट ऑटोमॅटिक असिस्ट आणि फॉलो मी होम फंक्शन बरोबर बघायला मिळते. सर्वात महत्त्वाचं समोरच्या गाडीच्या खालच्या बाजूला आपल्याला सेन्सर सुद्धा बघायला मिळतो. या गाडीच्या बोनेट वरती डिझाईन सुद्धा आहे व गाडीमध्ये आपल्याला रेंज सेंसिंग असे ॲडव्हान्स वायपर्स बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला एडस चा कॅमेरा रूप रेल्स व शार्क फिन अँटेना सुद्धा देण्यात आलेला आहे. या अँटेना मध्ये जीपीएस आहे. या गाडीचे आऊटसाईड मिरर इलेक्ट्रिकली ऍडजेस्टेबल व एलईडी टर्न इंडिकेटर बरोबर बघायला मिळते. या दोन्ही मिरर वर आपल्याला थ्री सिक्सटी डिग्री चा कॅमेरा देण्यात आलेला आहे.
या गाडीची लांबी 4.3 मीटर, 1.8 मीटर जाडी व 1.7 मीटर उंची आहे . या गाडीचा 2. 7 मीटर व्हील बेस आहे. 205 mm एवढा ग्राउंड क्लिअरन्स आहे व 26.5 डिग्री अॅप्रोच अँगल आहे आणि 1600 किलो या गाडीची वजन आहे. या गाडीच्या टॉप मॉडेल मध्ये आपल्याला 19 इंची एलईडी देण्यात आलेला आहे व 18 इंची आणि 17 इंच चा सुद्धा ऑप्शन आहे. या गाडीच्या चारी चाकणमध्ये आपल्याला डिस्क ब्रेक देण्यात आलेला आहे. या गाडीचे टायर साइज 255 R9H MRF रेडिएटेड ट्यूबलेस टायर मिळतात. या गाडीच्या अलाईजमध्ये टाटा मोटरचा लोगो सुद्धा देण्यात आलेला आहे. या गाड्यांमध्ये आपल्याला वेगवेगळे कलरची ऑप्शन देण्यात आले आहे जसे की लाल, पिवळा, हिरवा, पांढरा, ग्रे आणि सिल्वर कलर चा सुद्धा ऑप्शन देण्यात आलेला आहे. गाडीच्या मागच्या साईडला क्लाइंब सेल टिल गेट देण्यात आलेला आहे. या गाडीतून ड्रायव्हिंग मोड आपल्याला बघायला मिळतात जी आहेत सिटी आणि स्पोर्ट. व तीन ट्रेन मोड मिळतात जी आहेत नॉर्मल, वेट आणि रफ. या गाडीमध्ये तीन रिलॅक्स मोड सुद्धा आपल्याला बघायला मिळतात जी आहेत वॉटर फायर आणि स्पेस. मागच्या साईडला रियर फोग लॅम्प स्किट प्लेट रियर सेंसर देण्यात आलेले आहेत.
या गाडीमध्ये 17 इंच स्टील स्पियर चाक देण्यात आलेला आहे. याचा उपयोग जर का आपली गाडी पंचर झाली तर हे चाक लावून आपण गाडी चालू शकतो. गाडीच्या मागच्या डिक्की वरती टाटा मोटर चा लोगो आपल्याला बघायला मिळते. व सियाराची बॅजिंग सुद्धा. मागच्या काचेला सुद्धा रियर वाइफ वर वॉशर बरोबर देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला 5g कॅपॅबिलिटीज दहा इसीयू आणि स्नॅपड्रॅगन ऑटो 5g एस ए522 चीप बघायला मिळते. पुढच्या चाकांमध्ये आपल्याला कॉल सस्पेन्शन देण्यात आलेला आहे व मागच्या चाकांमध्ये कॉल स्प्रिंग बरोबर शोक अब्सोर्बर बरोबर ट्विस्ट भीम सस्पेन्शन देण्यात आलेला आहे.या गाडीमध्ये आपल्याला लेव्हल टू एडस देण्यात आलेला आहे.
Interior Design:
चला तर मग या गाडीच्या इंटिरियर फीचर्स बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. या गाडीमध्ये आपल्याला आयरा 2.0 कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी बघायला मिळते जिने आपण गाडीचे मोबाईल मधून खूप सारे फीचर्स एक्सेस करू शकतो जसे की शेड्युल केबिन प्रे कंडिशनिंग इंजिन स्टार्ट, केबिन कॉलिंग, ओवर स्पीड अलर्ट आणि टाइम्स फेंसिंग इत्यादी असे भरपूर सारे पिक्चर्स आपण मोबाईल वरून वापरू शकतो. या गाडीचे डिक्की आपण बटनाने किंवा खाली पाय फिरवून सुद्धा उघडू शकतो. या गाडीची बूट स्पेस 622 लिटर ची आहे. गाडीचे मागचे सीट जर का आपण फोल्ड केले तर ती 1257 लिटर एवढी होऊन जाईल. या गाडीमध्ये भन्नाट असे फीचर्स देणे आलेला आहे जे दुसऱ्या गाडीमध्ये मिळत नाही ती आहे बूट ओपन मल्टीपर्पज सेफ्टी लाईट. गाडीच्या डिक्की मध्ये टूल किट सुद्धा देण्यात आलेला आहे. या गाडीच्या डिक्की मध्ये भरपूर असे गोष्टी देण्यात आलेला आहे जसे की तीन किलो वजनाच्या कॅपॅसिटीचे हुक, बारा व्होल्ट चा पोर्ट, लाईट, व स्पीकर. या गाडीमध्ये आपल्याला बारा स्पीकर चा जेबीएल चा ब्लॅक साऊंड सिस्टिम सबबुपर आणि डॉल्बी ॲटमॉस 5.1 बरोबर मिळते. वन टच ऑप्शन बूट क्लोज करण्यासाठी दिलेला आहे.
या गाडीचे दरवाजे वरती डोअर हँडल वेलकम लाईट बरोबर आहेत. या गाडीच्या मागच्या दरवाजांमध्ये पडल्या बॉटल होल्डर ,अम्ब्रेला होल्डर, पावर विंडो चे बटन आणि स्पीकर आपल्याला बघायला मिळते. या गाडीचे सीट आपल्याला लेदर एपॉसिटी मध्ये आहेत व फॅब्रिक एपॉसिटी चा सुद्धा ऑप्शन आहे. गाडीचे मागचे सीट टू स्टेज रिक्लीन आहेत. गाडीच्या मागच्या सीट वरती आपल्याला तीन ऍडजेस्टेबल हेड रेस्ट देण्यात आलेला आहे. गाडीचे मागचे सीट 60:40 चे आपण फोल्डिंग करू शकतो. गाडीच्या मागच्या सीटच्या पॅसेंजर साठी दोन एसीव्हेंट व दोन चार्जिंग चे पोर्ट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
गाडीच्या मागच्या सीट वरती आपल्याला एक आमरेस्ट देण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन बॉटल होल्डर सुद्धा आहेत. समोरच्या पॅसेंजर डोअर वरती सुद्धा लाईट स्पीकर बॉटल होल्डर व अम्ब्रेला होल्डर देण्यात आलेला आहे. फ्रंट पॅसेंजरच्या सीट मध्ये थाई एक्सटेंडर सुद्धा आहे. ड्रायव्हर साईटच्या दरवाजा वरती वन शॉट अप डाउन एन्टीपेंंच पावर विंडो भेटते . ड्रायव्हर साईडला सुद्धा लाईट स्पीकर अम्ब्रेला होल्डर बॉटल होल्डर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ड्रायव्हरच्या दरवाज्यावरती फ्लोटिंग आम रेस्ट पावर विंडो चे कंट्रोल देण्यात आलेला आहे. या गाडीचे ड्रायव्हर सीट सिक्स वे पॉवर ऍडजस्टेबल वेलकम फंक्शन आणि मेमरी बरोबर आहे. गाडीच्या समोरच्या बाजूला व्हेंटिलेटर सीट थाई सपोर्ट एक्सचेंज बरोबर मिळते. गाडीचे समोरचे सेटबेट हाईट ऍडजेस्टेबल आहेत. गाडीचे स्टेरिंग टेल्ट आणि टेलिस्कोपिक मध्ये आहे. या गाडीमध्ये ड्युअल टोन हॉर्न आहे. या गाडीमध्ये आपल्याला सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सेवेन स्पीड डीसी हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे ऑप्शन उपलब्ध आहेत. डिझेलमध्ये सिक्स स्पीड ऑटोमॅटिक आणि सिक्स स्पीड मॅन्युअलचे ऑप्शन आहेत.
या गाडीमध्ये आपल्याला १२.३ इंचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले ॲमेझॉन अलेक्सा मॅपल्स, अँड्रॉइड ऑटो, एप्पल कार प्ले, व्हॉइस असिस्ट कमांड गेमिंग, स्त्रीमींग, एफ एम ,रेडिओ व असे भन्नाट सारे फीचर या इम्पोर्टेन्ट डिस्प्ले मध्ये आहेत. या गाडीमध्ये आपण AQI सुद्धा मॉनिटर करू शकतो. या गाडीमध्ये आपल्याला 10.25 इंचीचा डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपण स्पीड, आरपीएम, नेवीगेशन, एवरेज, कुलंट टेंपरेचर, आऊटसाईड टेंपरेचर, टाईम, ड्राईव्ह मोड, ओडो मीटर इत्यादी असे फीचर्स आहेत.
Safety Features:
चला तर मग या गाडीच्या सेफ्टी फीचर्स बद्दल जाणून घेऊयात. जसे की तुम्हाला माहितीच आहे टाटाची गाडी सर्वात सेफ अशी मानली जाते. या गाडीच्या सेफ्टी मध्ये सर्वात महत्त्वाची आपल्याला सहा एअरबॅक्स देण्यात आलेले आहेत. एबीएस, ईबीडी, 360 डिग्री कॅमेरा, रियर ऑक्यूमेंट सेन्सर, पार्क असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, सेंटर लॉकिंग, ऑटो होल्ड, रियर पार्किंग सेन्सर, आय एस ओ फिक्स चाइल्ड माउंटिंग सीट, पंचर रिपेअर किट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, रोल ओवर मिटीगेशन, वेहिकल डायनामिक कंट्रोल, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, डायनॅमिक टॉर्क वेटट्रिंग, ऑटोमॅटिक व्हेईकल होल्ड, हिल असेंट कंट्रोल, हायड्रोलिक ब्रेक असिस्ट, हायड्रोलिक ब्रेक फेल कंपनीसेशन, इलेक्ट्रॉनिक ब्रेक प्रिफिल, इंजिन टॉर्क कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, पेनिक ब्रेक अलर्ट, डायनॅमिक ब्रेकिंग सपोर्ट, इम्पॅक्ट ब्रेकिंग, डायनॅमिक स्टेरिंग टॉर्क इत्यादी एवढे असे फीचर्स आपल्याला सेफ्टी मध्ये बघायला मिळतात.
Engine Specifications:
चला तर मित्रांनो या गाडीच्या इंजिन बद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. या गाडीमध्ये पंधराशे सीसी इन लाईन फोर सिलेंडर टर्बो चार्ज गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन टी जी टी टाटा हायपर रिऑन पेट्रोल इंजिन. फिफ्टी बार डायरेक्ट फ्यूल इंजेक्शन ड्युअल व्हेरिएबल कॅम टाइमिंग आणि इंटेलिजंट लुब्रिकेशन सिस्टम सोबत 157 हॉर्स पावर 255 एन एम टॉर्क 190 km/hr ची टॉप स्पीड . या गाडीमध्ये आपल्याला 13 च ऍव्हरेज भेटेल 50 लिटरच्या फ्यूल टॅंक बरोबर.
चला तर मित्रांनो आम्हाला नक्की सांगा तुम्हाला या गाडी बद्दल माहिती जाणून कशी वाटली. या गाडी बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
मारुती सुझुकी व्हिक्टोरिएस या गाडी बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
धन्यवाद.
